मी शिक्षण घेतलेल्या शाळेला आयएसओ मानांकन मिळते हे अभिमानास्पद

माजी नगराध्यक्ष संजू परब यांचे जी प शाळा नं ४ बाबत गौरवोद्गार

सावंतवाडी ता.२९-: ज्या शाळेत मी शिकलो त्या शाळेला आज आयएसओ मानांकन मिळाले आहे. ही खरोखरच अभिमानास्पद गोष्ट असून या शाळेची अशीच प्रगती होऊदे तसेच मी ज्या शाळेत शिकलो त्या नगरीचा मी नगराध्यक्ष झालो असे गौरवोद्गार माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी काढले. ते आज जि.प प्राथमिक शाळा नं.४ चा आयएसओ मानांकन प्रदान सोहळा कार्यक्रमात बोलत होते.

यावेळी बोलताना परब म्हणाले की. त्यांनी जि.प.प्राथमिक शाळा ४ ही इमारत उभारण्यासाठी आमदार दिपक केसरकर व माजी जि.प अध्यक्ष. रेशमा सावंत यांनी केलेला सहकार्य बदल त्यांचे आभार मानले तसेच या शाळेसाठी जे जे सहकार्य लागेल ते आपण करून असा शब्द देखील त्यांनी यावेळी दिला. तसेच परब म्हणाले की मी आज या कार्यक्रमाला आमदार दीपक केसरकर यांच्या सोबत उपस्थित आहेत.

केसरकर यांनी मला हक्काने हाक मारली. त्यामुळे ते माझे कोणतेही राजकीय वैरी नसल्याचे केसरकर यांनी दाखवून दिल्याचे परब यांनी बोलताना उल्लेख केला. यावेळी व्यासपीठावर महेश धोत्रे, रामचंद्र अंगणे, कल्पना बोडके स्नेहा लंगवे, आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page