समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांचे प्राण वाचवणाऱ्या जीवन रक्षक संजय गोसावी यांचा करण्यात आला सन्मान

भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्थेच्या वतीने करण्यात आला सत्कार

*💫वेंगुर्ले दि.१४-:* रेडी येथील यशवंत गड समुद्रकिनारी पोहण्याचा आनंद घेत असताना समुद्राच्या पाण्याचा अंदाज न आल्याने बुडणाऱ्या सात पर्यटकांचे प्राण वाचवणाऱ्या जीवनरक्षक संजय गोसावी यांच्या धाडसी कार्याबद्दल भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्थेच्या वतीने शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व १० हजार रुपयाचा धनादेश देऊन सन्मान करण्यात आला आहे. त्यांच्या या धाडसी कार्याची माहिती मुख्यमंत्री, गृहमंत्री, पर्यावरण मंत्री व जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग याना निवेदनाद्वारे देण्यात आली आहे. हा सन्मान करते वेळी समितीचे जिल्हा सहसचिव राजेश सातोस्कर, खजिनदार सौरभ नागोळकर, कोकण विभाग सीईओ राजन रेडकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page