*💫बांदा दि.१४-:* शेर्ले-आरोसबागवाडी येथे नव्याने बसविण्यात आलेल्या ट्रान्सफार्मरचे उद्घाटन शेर्ले सरपंच जगन्नाथ धुरी यांच्या हस्ते करण्यात आले. नव्याने बसविण्यात आलेल्या ट्रान्सफार्मर मुळे शेर्ले आरोसबागवाडी येथील ग्रामस्थांना आता कमी दाबाच्या वीज समस्या संपुष्टात आली आहे. यावेळी ग्रा.पं सदस्य राखी मिशाल, अनंत बांदेकर, अभियंता आपटेकर, माजी सरपंच दयानंद धुरी, मानकरी अरुण धुरी, माजी ग्रा.पं. सदस्य नितीन धुरी, ठेकेदार बाळु गावडे, उदय म्हसकर, उदय तारी, हरीचंद्र बांदेकर, चंद्रकांत परब, आरोबागवाडीतील ग्रामस्थ उपस्थित होते. गेली अनेक वर्षे शेर्ले आरोसबागबागवाडी येथे वीज ग्राहकांची संख्या वाढल्यामुळे ग्रामस्थांना कमी दाबाच्या विजेच्या समस्येला तोंड द्यावे लागत होते. त्यामुळे या भागातील कमी दाबाच्या वीजेमुळे मंद प्रकाश व नळ पाणीपुरवठ्यावर परिणाम होत होता. आरोसबागवडीतील ग्रामस्थांच्या सततच्या मागणीनंतर सरपंच जगन्नाथ धुरी व आरोसबागवाडी प्रभागाचे ग्रा.पं.सदस्य यांच्या प्रयत्नामुळे व सततच्या पाठपुराव्यामुळे वीज वितरण कंपनीने येथे नव्याने ट्रांसफार्मर बसऊन योग्य दाबाचा वीजपुरवठा सुरळीत केला.
शेर्ले आरोसबागवाडीत नवीन ट्रान्सफार्मरचे उद्घाटन
