खासदार गजानन कीर्तिकर यांची संदेश पारकर यांनी घेतली भेट;राजकीय घडामोडिंचा आढावा

कणकवली ता.२४-:* शिवसेना ज्येष्ठ नेते खासदार गजानन कीर्तिकर हे कणकवली येथे आले असता शिवसेना युवानेते संदेश पारकर यांनी त्यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सध्याच्या राजकीय घडामोडिंचा आढावा खासदार श्री.कीर्तिकर यांनी श्री.पारकर यांच्याकडुन घेतला.

यावेळी श्री.पारकर यांच्यासोबत युवासेना माजी जिल्हाप्रमुख अँड.हर्षद गावडे, विशाल कसालकर, बाबु केणी उपस्थित होते. तसेच शिवसेना सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या संघटनात्मक बांधणी विषयी देखील श्री.पारकर यांनी खासदार महोदयांशी चर्चा केली. यावेळी खासदार श्री.गजानन कीर्तिकर यांचे स्वागत संदेश पारकर यांनी केला. यावेळी खासदार श्री.कीर्तिकर यांनी संदेश पारकर यांना उज्वल राजकिय कारकिर्दीसाठी शुभेच्छा देत आशिर्वाद दिले. तसेच मुंबईत आल्यावर भेटण्याची सुचना खासदार श्री.कीर्तिकर यांनी संदेश पारकर यांना केली.

You cannot copy content of this page