चालक किरकोळ जखमी
कणकवली ता.२४-:* खडीची वाहतूक करीत असलेला डंपर कणकवली हळवल शिवडाव मुख्य रस्त्यावर हळवल ग्रामपंचायतच्या पुढे असलेल्या चढावा दरम्यान पलटी झाला.या अपघातात डंपर चालकाला किरकोळ दुखापत झाली.मात्र मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. हळवल शिवडाव मुख्य रस्त्यावरून कणकवलीच्या दिशेने येणारा डंपर ब्रेक डाउन झाल्याने पलटी झाला.पूर्णतः खडीने भरलेला डंपर पलटी झाल्याने डंपर चालकाला किरकोळ दुखापत झाली आहे.
यादरम्यान कणकवली हळवल शिवडाव रस्त्यावर दोन्ही बाजूची वाहतूक विस्कळीत झाली. जखमी झालेल्या चालकाला हळवल येथील खासगी दवाखान्यात हलविण्यात आले. दरम्यान हळवल गावचे माजी पोलीस पाटील प्रकाश गुरव, ग्रामपंचायत सदस्य सुदर्शन राणे, शिवा राणे व मार्गावरून प्रवास करणारे ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांच्या सहाय्याने मदतकार्य सुरू आहे.
