कणकवली विधानसभा मतदारसंघात 22 गटनिहाय अभियान राबवणार:सुशांत नाईक

युवासेना सदस्य नोंदणी अभियानाचा आम.वैभव नाईक यांच्याहस्ते शुभारंभ

कणकवली 24 एप्रिल (प्रतिनिधी)- युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार व युवासेना सचिव वरून सरदेसाई यांच्या मार्गदर्शनानुसार कणकवली विधानसभा मतदारसंघात युवा सेना सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. या अभियानाचा शुभारंभ आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते करण्यात आला. कणकवली विधानसभा मतदारसंघातील तब्बल 100 जणांना युवासेना सदस्य नोंदणी अभियान अंतर्गत ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले. कणकवली विधानसभा मतदारसंघात 22 गटनिहाय अभियान राबविण्यात येणार असून त्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी दिली.

यावेळी माजी युवा सेना जिल्हाप्रमुख ॲड. हर्षद गावडे, जिल्हा समन्वयक राजू राठोड, युवासेना तालुकाप्रमुख ललित घाडीगांवकर, नगरसेवक कन्हैया पारकर, सुजित जाधव, रामू विखाळे, माजी नगरसेवक भूषण परुळेकर, अनुप वारंग, योगेश मुंज, तेजस सावंत, सिद्धेश राणे, किरण वर्दम, सचिन (बाळू) पवार, उमेश गुरव, रोहित राणे, संतोष परब, रिमेश चव्हाण, परेश जाधव, राहुल जाधव, सोहम वाळके, रुपेश आमडोसकर, गौरव हर्णे, यश घाडीगांवकर, लौकिक सावंत, अजित घाडीगांवकर, लक्ष्मण, प्रेम पवार, सचिन पवार, आशिष कांबळे, रोहित जाधव, विशाल भोई, विशाल जाधव, किशोर जाधव, अविराज खांडेकर, राजेश परब, रोहित जाधव, अब्दुल खान, रोहित ठाकूर, मंदार मेस्त्री, चेतन राणे, साई मोरये, प्रमोद पिळणकर, दिपेश परब, परेश जाधव, राहुल जाधव, सचिन आचरेकर, सोहम वाळके, गौरव हर्णे, यश घाडीगांवकर, लौकिक सावंत, रवी भंडारे आदी शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक व युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page