कणकवली 24 एप्रिल (प्रतिनिधी)- कणकवली-आचरा मार्गावरील कलमठ मच्छी मार्केट नजीक असलेल्या पोलला लक्झरी बस जाऊन धडकली.या धडकेत पोल कोसळून एका स्टॉलवर अडकला मात्र सुदैवाने हानी टळली असल्याने सर्वांनीच सुटकेचा निःश्वास सोडला. कणकवलीहून आचऱ्याच्या दिशेने जाणारी रामेश्वर ट्रॅव्हल्सची लक्झरी कणकवली आचरा रस्त्यावर कलमठ मच्छी मार्केटनजीक असलेल्या पोलला जाऊन धडकली. हा अपघात रविवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडला.
दरम्यान ज्या पोलला लक्झरीने धडक दिली तो पोल लक्झरीसह जाऊन बाजूच्या स्टॉलला अडकला. हि धडक एवढ्या जोरात होती की, लोखंडी पोल अक्षरशा वाकडा झाला होता. मात्र पोल असल्यामुळेच सुदैवाने त्या स्टॉल मध्ये असलेली व्यक्ती बालंबाल बचावली. रविवारी सकाळच्या सत्रात पावसाने रस्ता निसरडा झालेला असल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येते. मात्र सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. कणकवली आचरा मार्गावर वाहतूक मोठया प्रमाणात वाढली असून यामध्ये डंपरची वाहतूक जास्त असते .रविवार असल्याने मासे खरेदीसाठी कलमठ मच्छी मार्केट येथे गर्दी असते मात्र केवळ दैव बलवत्तर म्हणूनच हानी टळली असल्याचे मानले जाते.
