हरकुळबुद्रुक सोसायटी निवडणूकीतही शिवसेनेने भाजपचा केला दारुण पराभव

13 पैकी 13 जागांवर शिवसेनेच्या पॅनलचा विजय

कणकवली ता.२४-:* जिल्हा बँक निवडणूकीनंतर शिवसेनेने सहकार क्षेत्रात मजबूत पाय रोवण्यास सुरुवात केली असून विकास सोसायटीच्या निवडणूकांमध्ये आपले वर्चस्व राखण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.कणकवली तालुक्यातील मोठया सोसायट्या ताब्यात घेतानाच हरकुळबुद्रुक सोसायटीही शिवसेनेच्या ताब्यात 13 पैकी 13 जागांवर शिवसेनेच्या पॅनलने विजय संपादन केला आहे.

जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत यांनी स्वतः कणकवली तालुक्यात सोसायटी निवडणुकीत लक्ष घातल्याने बहुतांश सोसायट्या शिवसेनेच्या ताब्यात येत असल्याचे दिसू लागले आहे. कणकवली तालुक्यातील हरकुळबुद्रुक विविध कार्यकारी सोसायटी निवडणुकीत शिवसेनेच्या सहकार समृद्धी पॅनलच्या 13 पैकी 13 जागा शिवसेना निवडून येत भाजपचा मोठा पराभव केला आहे.

यावेळी हरकुळ बुद्रुक येथील ग्रामस्थांनी सतीश सावंत यांना उचलून घेत सतीश सावंत आगे बढो हम तुम्हारे साथ है कोन आला रे कोन आला शिवसेने चा वाघ आला अशा घोषणा देत फटाक्‍यांची आतषबाजी करून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी खासदार विनायक राऊत यांनी देखील हरकुळ बुद्रुक सोसायटीला भेट देऊन विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले .कणकवली तालुक्यातील सोसायटीच्या निवडणुकीत शिवसेनेने आपली विजयाची घोडदौड चालू ठेवत हरकुळबुद्रुक ही सोसायटी देखील आपल्या ताब्यात घेऊन भाजपला मोठा धक्का दिला.

यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख तथा जिल्हा बँक संचालक सुशांत नाईक,शिवसेना नेते संदेश पारकर, शिवसेना तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत, नगरसेवक कन्हैया पारकर, सेना पदाधिकारी यांच्यासह माजी सरपंच आनंद ठाकूर, डॉ. अनिल ठाकूर, दिवाकर पारकर, आप्पा साबळे ,आयुब पटेल,मोहन सोहनी , नित्यानंद चिंदरकर, बाळा वाळके, पांडुरंग साबळे, शंकर सापळे, अशोक घाडीगावकर, वामन गोसावी, आनंद महाडेश्वर अमित खोचरे ,गणेश पाटील, चंद्रकांत महाडेश्वर, श्रीधर चव्हाण, सुनील अपराज, आबू अपराज उपस्थित होते.

You cannot copy content of this page