बांदा ता.२४-:* सिद्धिविनायक कला, क्रीडा व महिला मंडळ पाडलोस-शीतलवाडी आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131व्या जयंतीनिमित्त सोमवार 25 एप्रिल रोजी संपूर्ण दिवसभर भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी दहा वाजतापासून कार्यक्रमास सुरुवात होणार आहे. प्रथम प्रतिमेचे पूजन व बुध्दवंदना, नंतर स्वागत व परिचय, स्वागत गीत, मान्यवरांची भाषणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक, महिलांचे व मुलांचे विविध खेळ, शितलवाडी व गावातील छोट्या-मोठय़ा कलाकारांचे विविध करमणुकीचे कार्यक्रम होणार आहेत.
रात्री 10.30 वाजता बाळकृष्ण गोरे दशावतार नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून गोव्याचे युगनायक सचिव जितेंद्र गावकर तर अध्यक्ष म्हणून पाडलोस सरपंच अक्षरा पाडलोसकर उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष यशवंत पाडलोसकर, सचिव शिवराम पाडलोसकर व खजिनदार महादेव पाडलोसकर यांनी केले आहे.
