दोनशे कलमे जळून खाक*
*💫मालवण दि.१३-:* मालवण तालुक्यातील आनंदव्हाळ कर्लाचाव्हाळ येथे माधुरी बाळकृष्ण गावकर यांच्या आंबा कलम बागेस आज दुपारी साडे बारा शॉर्टसर्किटने आग लागल्याची घटना घडली. यात सुमारे दोनशे आंबा कलमे जळून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. मालवण शहरातील रेवतळे येथील माधुरी गावकर यांची आनंदव्हाळ कर्लाचाव्हाळ येथे आंबा कलम बाग आहे. आज दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास शॉर्टसर्किट होऊन ठिणगी पडल्याने बागेतील गवताने पेट घेतला. वाऱ्यामुळे आग पसरल्याने यात बागेतील सुमारे दोनशे कलमे जळाली. यात लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. याबाबतची माहिती येथील पोलिस ठाण्यात देण्यात आली आहे.
