होडावडा येथील त्या जमीनदोस्त करण्यात आलेल्या शाळेची चौकशी करून अहवाल सादर करा

बांधकाम समिती सभा अध्यक्ष बाळा जठार यांचे आदेश*

*💫सिंधुदुर्गनगरी दि.१३-:* वेंगुर्ला तालुक्यातील होडावडा येथील दुरूस्तीसाठी घेतलेली शाळा कोणी पूर्णपणे जमीनदोस्त केली. याची चौकशी करून समितीसमोर अहवाल सादर करण्यात यावा. असे आदेश बांधकाम समिती सभा अध्यक्ष बाळा जठार यांनी दिले. जिल्हा परिषद बांधकाम समितीची सभा बॅरिस्टर नाथ पै समिती सभागृहात आज संपन्न झाली. यावेळी समिती सचिव तथा बांधकाम कार्यकारी अभियंता अनामिका जाधव, सदस्य प्रदीप नारकर, राजेश कविटकर, श्रेया सावंत यांच्यासह खातेप्रमुख अधिकारी कर्मचारी वर्ग उपस्थित होते. होडावडा येथील दुरुस्तीसाठी घेण्यात आलेली शाळा जमींनदोस्त केल्याने तेथे आता नवीन इमारत बांधण्यास जमीन मालकाने विरोध दर्शविला आहे. सदरील शाळा जिल्हा परिषद मालकीची असल्याने ती दुरुस्त करण्यास कोणतीही अड़चन नव्हती.मात्र निर्लेखनाचा प्रस्ताव नसताना शाळेची इमारत पुर्णपणे पाडण्यात आली आहे.ही इमारत बांधकाम विभागाने तसेच ठेकेदाराने पाडलेली नाही तर मग ती कोणी पाडली? असा प्रश्न उपस्थित करत सदरील शाळा कोणी पडली याची चौकशी करुन पुढील समिती सभेसमोर अहवाल सादर करा.असे आदेश यावेळी सभापती रविन्द्र जठार यांनी दिले. शिक्षण विभागास साडेसहा कोटी निधी शाळा दुरुस्ती साठी प्राप्त झाला असून अत्यंत जीर्ण व तातडीने दुरुस्ती आवश्यक आहे .अशा शाळा प्राधान्याने दुरुस्तीसाठी घेण्यात याव्यात. तसेच देवगड नाद येथील ग्रामपंचायतला स्वतःची जागा उपलब्ध नसल्याने तेथे १९९३ पासून बंद असलेल्या प्राथमिक शाळेची जागा ग्रामपंचायत इमारत बांधन्यासाठी देण्यात यावी. अशी मागणी समिती सदस्य प्रदीप नारकर यांनी केली.

You cannot copy content of this page