खारेपाटण हसोळटेंबकोंड शाळेत पूर्वतयारी मेळावा

कणकवली ता.२३-:* कणकवली तालुक्यातील खारेपाटण येथील जि. प. प्राथमिक शाळा हसोळ टेंम्ब कोंडवाडी शाळेत नुकताच शाळा पूर्वतयारी मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाची सुरुवात प्रभात फेरीने करण्यात आली. यावेळी गावात शाळा प्रवेश याबाबत प्रबोधन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खारेपाटण गावचे सरपंच रमाकांत राऊत हे होते कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश राऊत शिक्षण तज्ञ महेश बाळकृष्ण राऊत, श्रीमती श्रावणी राऊत ,सचिन राऊत, राहुल कावळे ,अर्पिता राऊत ,रिया शिंदे साक्षी खांडेकर, श्रीमती पाळेकर , अंगणवाडी सेविका शीतल कापसे, स्वयंपाकी मयुरी खांडेकर ,शाळेचे शिक्षक मंगेश मुद्रस व शाळेचे मुख्याध्यापक प्रवीण कासार सर उपस्थित होते याप्रसंगी सात स्टॉल उभारण्यात आले होते त्याचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष महेश शंकर राऊत यांनी केले यावेळी इयत्ता पहिलीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे औक्षण करून त्यांचे स्वागत करण्यात आले त्यांच्या सामाजिक बौद्धिक भावनिक भाषिक व गणन पूर्वतयारीचा आढावा घेण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण कासार यांनी केले तर आभार मंगेश मुद्रस यांनी मानले .

You cannot copy content of this page