माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांची शिवसेनेला सोडचिठ्ठी

वैयक्तीक कारणास्तव दिला राजीनामा : मालवणच्या जनतेचे मानले आभारी

मालवण ता.२०-:* मालवणचा विकास करता करता कुटुंब, आरोग्य आणि व्यवसायाकडे दुर्लक्ष झाल्याने यापुढे पक्षीय कामाला वेळ देणे शक्य नसल्याचा कारणास्तव मालवणचे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांचा शिवसेनेला जय महाराष्ट्र म्हणत पक्षाला सोडचिठ्ठी देत असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितल्याने मालवणच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. याबाबत कांदळगावकर यांनी एक प्रसिद्धीपत्रक जारी करत पाच वर्षे नगराध्यक्ष पदाच्या खुर्चीवर बसविल्याबद्दल मालवणच्या जनतेचे आणि शिवसेनेचे आभार मानले असून पाच वर्षातील चांगल्या कामाचे श्रेय जर मला मिळत असेल तर झालेल्या चुकांची आणि त्याला उत्तर देण्याची जबाबदारी माझी राहील असेही कांदळगावकर यांनी स्पष्ट केले आहे. मालवणचे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन एक प्रसिद्धीपत्रक जारी करत आपण शिवसेना पक्ष सोडत असल्याचे सांगितले. यावेळी त्यांच्या समवेत त्यांच्या पत्नी सौ. स्मृती कांदळगावकर उपस्थित होत्या.

कुठलीही राजकीय पाश्वभूमी नसताना नगरपरिषदेतील प्रशासकीय अनुभवावर गेली पाच वर्षे नगराध्यक्ष या प्रतिष्ठेच्या खुर्चीवर बसवल्याबद्दल मालवणच्या जनतेचे आणि शिवसेना पक्षाने आपल्या पक्षातून ही संधी उपलब्ध करून दिल्या बद्दल या सर्वांचे आपण मनापासून आभार मानतो. कुठलीही राजकीय स्पर्धा, शह काटशह मनात न ठेवता आपल्याला दिलेल्या पाच वर्षाच्या कालावधीत मालवण शहराचा विकास कसा करता येईल यासाठी प्रयन्तशील राहिलो.

हे करत असताना अनेक आरोप प्रत्यारोप झाले. पण हा राजकारणाचा एक भाग मानून याला उत्तर प्रत्युतरात वेळ न घालवता तसेच प्रसिद्धीच्या मागे जास्त वेळ फुकट न घालवता जास्तीत जास्त मालवण शहराच्या विकास कामाकडे लक्ष दिले. चांगले काम करणाऱ्या व्यक्ती वर आरोप होणार आणि काम करणाऱ्याकडून चुका होणार हे सर्वश्रुत आहे. पण हे करत असताना मालवणच्या जनतेची आणि माझ्या पक्षाची मान खाली जाईल, असे कुठलेही काम मागच्या पाच वर्षात केले नाही. मालवणच्या नगरपालिकेत राजकीय विरहित काम करताना एक- दोन वेळा सभागृहात मतदानाचे ठराव वगळता मागील पाच वर्षात सर्व ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात यश आले.

विरोधकांच्या प्रभागात पण लाखो रुपयाच कामे करण्यात आली आणि या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून विरोधी पक्षाच्या चार नगरसेवकान8 शिवसेना पक्षात प्रवेश केला त्यामुळे पक्षाची ताकद वाढवली, असे महेश कांदळगावकर यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. रस्ते, गटर स्वच्छता या मूलभूत सोयी बरोबरच मालवणचा पर्यटन दृष्ट्या विकास करण्याच्या दृष्टिने कोट्यावधी रुपयांचे प्रस्ताव तयार करण्यात आले. यामध्ये रॉक गाईन येथे डेकोरेटिव्ह लाईट म्युझिकल फाऊंटन, चिवला बीच येथे डेकोरेटिव्ह लाईट, आडारी गणपती मंदिर येथील सुशोभीकरण हॉटेल सायबा नजीकचे सुशोभीकरण, मालवण नगर परिषद आणि त्याचा परिसर सुशोभीकरण, पर्यटकांना उपयुक्त असे दिशा दर्शक फलक, बायो टॉयलेट, मामा वरेरकर नाट्यगृह येथे सुसज्ज असा एसी मल्टिपर्पज हॉल, अग्निशमन इमारत, सुसज्ज अशी भाजी मार्केट इमारत, न.प. सफाई कामगार याच्यासाठी बीओटी तत्वावर निवास व्यवस्था ही कामे करण्यात आली.

बंद असलेल्या भुयारी गटर योजनेला शासनाकडून अनुदान प्राप्त करून घेऊन ते काम पूर्णत्वाकडे नेण्यासाठी प्रयत्न केले. मालवणच्या नळपाणी योजनेला बरीच वर्षे झाल्याने त्या ठिकाणी सुमारे ४५ कोटी रुपयांची नवीन नळपाणी योजना प्रस्तावित करण्यात आली असून लवकरच त्याला अंतिम मंजुरी प्राप्त होणार आहे. कोकणातील पहिल्या प्रथम २५ कोटी रुपयांचा मत्स्यालयाचा प्रस्ताव शासन दरबारी अंतीम मंजुरीसाठी सादर आहे. अश्या प्रकारे गेल्या पंधरा वर्षात झाली नसतील एवढी कामे या पाच वर्षात करण्यात आली. अर्थात यासाठी शासन दरबारी मंजुरी आणि निधी आमचे आमदार, खासदार, पालकमंत्री, मंत्री यांच्या पाठपुराव्याशिवाय शक्य झाले नसते ही वास्तुतिथी आहे, असे कांदळगावकर यांनी म्हटले आहे.

मागील दोन वर्षाच्या कालावधीत कोरोनाचे संकट, तौक्ते वादळ यामुळे विकास कामांना अनेक अडचणी आल्या, कामे मुदतीत पूर्ण करता आली नाही हे नाकारता येणार नाही. पण सद्यस्तिथीत बरीचशी कामे पूर्ण झाली आहेत आणि काही कामे पूर्णत्वाकडे आहेत. टैंडर प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यात आली. त्यामुळे मागील पाच वर्षात बिलो टेंडर मंजुरी तुन जवळपास ६० ते ७० लाख रुपयाची शासनाच्या निधीची बचत करण्यात आली.

मालवणच्या विकासकांना मालवण न.प. तर्फे पूर्णपणे सहकार्याची भूमिका ठेवल्यानेच आज मालवण मध्ये अनेक मोठे प्रकल्प सुरू आहेत आणि मालवणच्या सौंदर्यात भर पडली आहे, असेही कांदळगावकर यांनी म्हटले आहे परंतु मागील पाच वर्षे मालवणचा विकास हा एकमेव अजंडा घेऊन काम करत असताना माझा कुटूंबाकडे, आरोग्याकडे व्यवसायाकडे दुर्लक्ष झाला. त्यामुळे यापुढे पक्षाच्या कामाला प

You cannot copy content of this page