पंचशील विकास मंडळ खारेपाटणच्यावतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
कणकवली ता २०-:* पंचशील विकास मंडळ खारेपाटण व संघमित्रा महिला मंडळ खारेपाटण यांच्या सयूंक्त विद्यमाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती निमित्त इयत्ता ५ वी तील विद्यर्थ्यांकरिता आयोजित करण्यात आलेल्या खारेपाटण – तळेरे प्रभागस्तरीय शिष्यवृत्ती परिक्षेत तळेरे जि. प. शाळा नं.१ चा विद्यार्थी यश मंगेश दहिफळे या विद्यार्थ्याने ३०० पैकी २०० गुण मिळवून संपूर्ण प्रभागात प्रथम क्रमांक मिळविला.
या स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ नुकताच खारेपाटण पंचशीलनगर येथे डॉ. बाबासाहेब आबेडकर जयंती दिनी झाला. पंचशील विकास मंडळ खारेपाटण चे विदयमान अध्यक्ष श्री संतोष पाटणकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या गुणगौरव समारंभाच्या प्रारंभी खारेपाटण पंचशील नगर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धपुतळयाला मान्यवरांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.या कार्यक्रमाला शिक्षण विस्तार अधिकारी सुहास पाताडे, खारेपाटण व शेर्पे केद्रप्रमुख सद्गुरू कुबल,कासार्डे केंद्रप्रमुख संजय पवार,खारेपाटण केंद्रशाळेचे मुख्यध्यापक प्रदीप श्रावणकर तसेच सामाजिक कार्यकर्ते महेश कोळसुलकर,संकेत शेट्ये,मंगेश गुरव,सौ मीनल तळगावकर,संघमित्रा महिला मंडळ खारेपाटण च्या अध्यक्ष सौ आकांक्षा पाटणकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
खारेपाटण केंद्र शाळा नं.१ येथे दि.१३ एप्रिल २०२२ रोजी घेण्यात आलेल्या या प्रभाग स्तरीय शिष्यवृत्ती सराव परीक्षेत अनुक्रमे गुणवंत ठरलेले विद्यार्थी पुढील प्रमाणे — प्रथम क्रमांक – यश मंगेश दहीफळे(३०० पैकी २५० गुण),जि प शाळा तळेरे नं.१,द्वितीय – वेदांत विभिषण मुंडे (२४८ गुण ),जि प शाळा तळेरे न.१,तृतीय – सोहम संतोष लोकरे (२१६ गुण ),जि प केंद्र शाळा खारेपाटण नं.१,चतुर्थ – कु.राहत फातिमा इरफान सारंग (२१२ गुण ),जि प केंद्र शाळा खारेपाटण नं.१,सोहम शामराव विरादार (२१२ गुण ) जि प शाळा तळेरे नं.१, उतेजनार्थ -उत्कर्ष जयप्रकाश परब (१९६ गुण )जि प शाळा कसार्डे नं.१ या सर्व विद्यार्थ्यांचा उवस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते गुणपत्रक, प्रमाणपत्र,सन्मानचिन्ह,पुष्पगुच्छ व रोख रकमेची परितोषीके देऊन आयोजक पंचशील विकास मंडळ खारेपाटण च्या वतीने गौरविण्यात आले.खारेपाटण – तळेरे प्रभागातील खारेपाटण, शेर्पे,साळीस्ते व कासार्डे या ४ प्रमुख केंद्रातील शाळातील सुमारे ५५ विद्यार्थ्यांनी या शिष्यवृत्ती सराव परीक्षेत सहभाग घेतला.
” खारेपाटण – तळेरे प्रभागात शिष्यवृत्ती पूर्व तयारी सराव परीक्षेचे सुनियोजित व भव्य आयोजन करून पंचशील विकास मंडळ खारेपाटण यांनी राबविलेला शैक्षणिक उपक्रम निश्चितच समाजाला दिशादर्शक ठरणारा आहे. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती त्यांच्या विचारांचा जागर घालून तसेच सामाजिक प्रबोधन व शैक्षणिक उपक्रम राबवून साजरी करूया.” असे उदगार शिक्षण विस्तार अधिकारी सुहास पाताडे यांनी यावेळी गुणगौरव समारंभात मार्गदर्शन करताना काढले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे कार्यकर्ते संदीप पाटणकर, संतोष जुवाटकर,राहुल पाटणकर, प्रथमेश कदम,अशोक पाटणकर, दीपक गोवळकर,भरत पाटणकर, संतोष तुरळकर,मधुकर पाटणकर, सागर पोमेडकर,रवींद्र पाटणकर, धीरज जुमलेकर,संतोष मधुकर पाटणकर,हर्षल कदम आदीनी परिश्रम घेतले.
