Headlines

अखेर मदिना मज्जीद ते शिकेरी वाडा रस्त्याच्या कामाला मंजुरी…

एन एस यु आय तालुका उपाध्यक्ष जास्मिन लक्षमेश्र्वर यांच्या पाठपुराव्याला यश

सावंतवाडी ता.२०-:* सावंतवाडी शहरातील बाहेरचावाडा परिसरातील मदिना मज्जिद ते शिकेरी वाडा भागातील रस्ता संपूर्ण खराब झाला असून, तो रस्ता दुरुस्त करण्यात यावा अशी मागणी एन एस यु आय तालुका उपाध्यक्ष जास्मिन लक्षमेश्र्वर यांनी मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांच्याकडे केली होती. या मागणीला यश आले असून, या रस्त्याला मंजुरी मिळाली आहे. या रस्त्याचे काम येत्या काही दिवसात सुरू होणार असून, याबाबतची माहिती जास्मिन लक्षमेश्र्वर यांनी दिली आहे.

You cannot copy content of this page