हडी कालिकादेवी सोसायटी चेअरमनपदी सचितानंद गोलतकर

व्हाईस चेअरमन राजकुमार शेडगे भाजप पदाधिकाऱ्यांनी केले अभिनंदन

मालवण दि प्रतिनिधी मालवण तालुक्यातील हडी येथील श्री. कालिकादेवी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्यादित हडी या संस्थेच्या चेअरमनपदी सचितानंद गोलतकर व व्हाईस चेअरमन पदी राजकुमार शेडगे यांची निवड करण्यात आली.

यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, सरपंच महेश मांजरेकर, निवडणूक निर्णय अधिकारी अजय हिरलेकर, संतोष गावकर, किसान मोर्चा मालवण किशोर नरे, प्रकाश तोंडवळकर आदी मान्यवर तसेच सर्व संस्था संचालक उपस्थित होते. यावेळी नवनिर्वाचित संचालकांचे अशोक सावंत, धोंडी चिंदरकर यांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

You cannot copy content of this page