कणकवली ता.१४-:* मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी मनसे सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या घरी भेट देत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी परशुराम उपरकर यांनी देखील त्यांचे आभार मानले व मनसेच्या वाढीसाठी आपण नेहमी प्रयत्नशील असल्याचे सांगत राज ठाकरे यांनी आपल्यावर ठेवलेला विश्वास आपण सार्थकी लावणार असल्याचे सांगितले.
परशुराम उपरकर यांच्या वाढदिवसानिमित्त दिवसभर विविध सामाजिक क्रीडा चित्रातील कार्यक्रम आयोजित होत करण्यात आले होते.सकाळपासूनच शुभेच्छा देण्यासाठी जिल्हाभरातुन मित्रमंडळी तसेच मनसैनिक यांनी हजेरी लावली होती.
