*⚡बांदा ता.१४-:* रोणापाल – मडुरा तिठा येथील हनुमान मंदिरात शनिवार १६ एप्रिल रोजी श्री हनुमान जन्मोत्सव साजरा होत आहे. त्यानिमित्त संपूर्ण दिवसभर विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी श्रींची पूजाअर्चा, अभिषेक व धार्मिक विधी होतील.
दुपारी श्रीसत्यनारायण महापूजा, महाआरती, तीर्थप्रसाद होईल. सायंकाळी ६.३०वाजता आजगावकर दशावतार मंडळाचा ‘राम हनुमान युद्ध’ हा नाट्यप्रयोग होणार आहे. भाविकांनी श्री दर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन श्री हनुमान देवस्थान समितीकडून करण्यात आले आहे.
