देशसेवा करणारे सैनिक समाजापुढे आदर्श

माजी गृहराज्यमंत्री दिपक केसरकर : वैश्यभवन येथे सेवानिवृत्त सैनिकांचा सन्मान

सावंतवाडी ता.१४-:* देशाच्या सेवेसाठी प्राणांची बाजी लावणाऱ्या सैनिका प्रती आम्हाला अभिमान आहे. देशाची सेवा करणाऱ्या सैनिकांचा आदर्श समाजापुढे आहे. त्यांचा सन्मान करण्याचे मला भाग्य लाभले आहे, असे प्रतिपादन माजी गृहराज्यमंत्री आमदार दिपक केसरकर यांनी केले आहे.

चौकूळ येथे सैनिक भवन प्रकल्प आणि सावंतवाडी येथे सिक्युरिटी गार्ड प्रशिक्षण प्रकल्प संकल्प आपण केला आहे तो लवकरात लवकर मार्गी लावण्याचा प्रयत्न करू तसेच सिंधुरत्न योजनेतून सैनिकांच्या पत्नीसाठी योजना हाती घेण्याचा विचार देखील आमदार केसरकर यांनी व्यक्त केला. वैश्य भवन येथे भारतीय सैन्यातील सेवानिवृत्त सैनिकांचा सन्मान सोहळा सैनिक पतसंस्था आणि इंडियन एक्स सर्विसेस च्या माध्यमातून आयोजित करण्यात आला होता. या वेळी आमदार केसरकर बोलत होते.

You cannot copy content of this page