कणकवली ता.१४-:* महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, कणकवली शाखेची विषय नियामक सभा नुकतीच शाळा कणकवली नं.३ येथे झाली. माजी तालुकाध्यक्ष विनायक जाधव यांनी सभेचे प्रास्ताविक केले. त्यात त्यांनी गेल्या वर्षात केलेल्या सर्व उपक्रमांचा आढावा घेतला.
तालुका व जिल्हा संघटनेच्या सक्रिय सहभागामुळे उपक्रम राबवता आल्याबद्दल सांगितले. सर्वांनी दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी धन्यवाद व्यक्त केले. मागील नियामक सभेचे इतिवृत्त सविस्तर वाचून दाखवण्यात आले. मागील सभेपासून झालेल्या खर्चाचे सविस्तर वाचन करण्यात आले व मंजुरी घेण्यात आली. त्रैवार्षिक अधिवेशन संभाव्य खर्च , संवर्धन निधी , सभासद निधी , वाढदिवस निधी , ऑक्सिजन प्लँट निधी , व्याज, मुदत ठेव इत्यादींबद्दल सविस्तर सांगण्यात आले. अधिवेशनात मांडण्यात येणाऱ्या मागण्यांची यादी वाचून दाखवण्यात आली. नवीन मागण्या सुचविण्यात आल्या. तालुकाध्यक्ष विनायक जाधव व तालुका सरचिटणीस सुशांत मर्गज यांनी आभारपर मनोगत व्यक्त केले.
शिक्षक नेते गिल्बर्ट फर्नांडिस यांनी मावळत्या कार्यकारिणीला धन्यवाद दिले. नवीन कार्यकारिणी गठित करण्यात आली. त्यावेळी जिल्हा निरीक्षक म्हणून चंद्रसेन पाताडे , नारायण नाईक हे जिल्हा पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. तालुका कार्यकारिणीत पुढील शिक्षकांची विविध पदांवर सर्वानुमते निवड करण्यात आली. शिक्षक नेते – गिल्बर्ट फर्नांडिस , तालुकाध्यक्ष – टोनी म्हापसेकर , सरचिटणीस – महेंद्र पवार , प्रवक्ता – विनायक जाधव , कार्याध्यक्ष – दिलीप धामापुरकर व प्रशांत दळवी , कोषाध्यक्ष – महेश चव्हाण , कार्यालयीन सचिव – समीर पाटील , संपर्क प्रमुख – प्रशांत बोभाटे , प्रसिद्धी प्रमुख – प्रवीण कुबल , सहसचिव – संतोष कांबळे , तालुका उपाध्यक्ष तळेरे प्रभाग – अनिल खोत , कणकवली प्रभाग – राजेंद्र कडुलकर , हुंबरट प्रभाग – गौतम जाधव , फोंडा प्रभाग – धीरज हुंबे , कनेडी प्रभाग – संदीप तांबे यांची निवड करण्यात आली.
विभाग अध्यक्ष : तळेरे प्रभाग – दिनेश जंगले , कणकवली प्रभाग – प्रमोद पवार , बिडवाडी प्रभाग – संतोष सातवसे , फोंडा प्रभाग – हेमंत राणे , कनेडी प्रभाग – मंगेश लाड , तालुका संघटक – दिनेश सुद्रिक , जगन्नाथ घाडीगावकर , अंतर्गत हिशेब तपासणीस – सुनील गणपत कदम यांची निवड करण्यात आली.
केंद्र संघटक – खारेपाटण – अमोल तुपविहीरे, शेर्पे – आशिष दुधे, साळीस्ते- ज्ञानेश्वर परदेशी, कासार्डे – बालाजी फड, कणकवली – श्रीकांत बुचडे, बोर्डवे – दिलीप कदम, हळवल – राजेंद्र गोसावी, वागदे – सचिन सावंत, कळसुली – विलीस चोडणेकर, बिडवाडी – संतोष पाटील, जानवली – उमेश मोरे, सावडाव – मनोज पिळणकर, नांदगाव – मंचक कोरडे, डामरे तिवरे – राजेंद्र कवडे, हरकुळ खुर्द- श्रीकृष्ण ठाणेकर, फोंडा- देऊ होळकर, पियाळी – संदीप जाधव, घोणसरी – जयप्रकाश सावंत, नरडवे – अमोल वावरे, नाटळ – नितीन सातवसे, भिरवंडे – श्रेयस तायशेटे, हरकुळबुद्रुक – भारत धनवे यांची निवड करण्यात आली. सल्लागार – संतोष तांबे, प्रदिप श्रावणकर, श्रीकृष्ण कांबळी, सुनील गावकर, संदीप गोसावी, शिवाजी मडव, प्रदीप मांजरेकर, सत्यवान घाडीगावकर, विजय मेस्त्री, आनंद तांबे, सदानंद ठाकूर यांची सर्वानुमते अभिनंदनीय निवड करण्यात आली.
