विविध विकास योजनांबाबत केले मार्गदर्शन
कणकवली 14 एप्रिल (प्रतिनिधी)-भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने राष्ट्रवादी समता सप्ताह साजरा करण्यात आला.
या सप्ताहात राष्ट्रवादी पक्षाचे सामाजिक व न्याय विकास मंत्री नाम.धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सामाजिक विकास योजनेअंतर्गत लाभ सर्वसमाजातील घटकांपर्यंत पोहचविला जावा या उद्देशाने कणकवली तालुकाच्यावतीने राष्ट्रवादी कणकवली तालुका अध्यक्ष राजेंद्र पावसकर व ओ.बी.सी.सेल जिल्हा उपाध्यक्ष सुंदर पारकर यांच्या उपस्थितीत फोंडाघाट येथील बौद्ध समाज मंदिरात त्यापरीसरातील लोकांना विविध विकास योजनांचा लाभ मिळावा यांचे मार्गदर्शन करण्यात आले.कणकवली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने येथील समाजातील लोकांना भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त शुभेच्छा देण्यात आल्या.
