फोंडाघाट येथे जयंतीनिमित्ताने उद्या कवी अजय कांडर यांचे व्याख्यान

कणकवली ता.१२-:* घटनातज्ञ डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर बुधवार 13 एप्रिल रोजी सायं.7 वा. फोंडाघाट सिद्धार्थनगर नालंदा बुद्ध विहार येथे ‘अनुकरणातील बाबासाहेब’ या विषयावर प्रसिद्ध कवी अजय कांडर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

फोंडाघाट बौद्ध विकास मंडळ आणि भारतीय बौद्ध महासंघ शाखा फोंडाघाटत यांच्या संयुक्त विद्यमाने बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा कार्यक्रम विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमातून आयोजित करण्यात आला असून जयंतीच्या पूर्वसंध्येला ‘अनुकरणातील बाबासाहेब’ या विषयावर श्री कांडर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

जगात मोजक्या विचारवंतांपैकी बाबासाहेब आंबेडकर हे एक असून त्यांचा विचार अनुकरणातून जगभर स्वीकारला गेला. त्यांच्या विचाराच्या अनुकरणातून आपण चाललो तर जाती-धर्माच्या पलीकडे माणूस म्हणून आपण जगू शकतो. यासाठी बाबासाहेबांनी सांगितलेल्या मार्गावरून जाणे आज अधिक गरजेचे आहे. या अनुषंगाने या व्याख्यानात कवी कंडर मांडणी करणार आहेत. यावेळी चित्रकला,वक्तृत्व, आणि रांगोळी स्पर्धा तसे महिलांचे विविध गुणदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. त्याच बरोबर नालंदा बुद्ध विहार इथे पर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. तरी या कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन फोंडाघाट बौद्ध विकास मंडळ भारतीय बौद्ध महासभा शाखा फोंडाघाटतर्फे करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page