चोरटे सीसीटीव्ही मध्ये कैद
दोडामार्ग ता.१२-:* गजबजलेल्या दोडामार्ग बाजारपेठेत दूरसंचार केंद्र इमारती जवळ उभी करुन ठेवलेली मोटारसायल दोन तरुण चोरट्यानी चोरून नेल्याने बाहेर वाहने उभी करुन ठेवणाऱ्यात खळबळ उडाली आहे. या दोन्ही चोरट्याचा दूचाकी चोरण्याचा थरार दोडामार्ग गांधी चौकात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमऱ्यात कैद झाला आहे. रविवारी राञी ही चोरीची घटना घडली आहे.या बाबत दोडामार्ग पोलिस स्थानकात खबर दिली नाही.
