निगुडे माऊलीचा उद्या वर्धापनदिन

बांदा ता.१२-:* निगुडे गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊलीचा वर्धापन दिन दि. १३ एप्रिल रोजी साजरा आहे. यानिमित्त सत्यनारायण महापूजा, तीर्थप्रसाद व महाप्रसाद तसेच रात्री मुलांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम व जय हनुमान दशावतर नाट्य मंडळ आरोस यांचा नाट्यप्रयोग होणार आहे. सर्व कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन, उपसरपंच तथा देवस्थान समिती सचिव गुरुदास गवंडे यांनी केले आहे.

You cannot copy content of this page