श्री देव श्रीकृष्ण मूर्ती पुनः प्राण प्रतिष्ठापना आणि कलशारोहण समारंभास उत्साहात प्रारंभ…

मालवण दि प्रतिनिधी मालवण धुरिवाडा येथील श्रीकृष्ण मंदिरातील श्री देव श्रीकृष्ण मूर्ती पुनःप्राण प्रतिष्ठापणा आणि कलशारोहन समारंभास आजपासून मोठ्या उत्साहात आणि भक्तीपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. चार दिवस चालणाऱ्या या सोहळ्याचा प्रारंभ आज सोमवारी सायंकाळी भव्य मिरवणुकीने झाला. ढोल ताशांचा गजर आणि टाळ मृदुंगाच्या निनादात निघालेल्या या मिरवणुकीत वारकरी दिंडी, चित्ररथ सहभागी झाले.

होतेत्यामुळे ही मिरवणूक मालवणवासीयांबरोबरच पर्यटकांची लक्ष वेधून घेणारी ठरली. मालवण धुरीवाडा येथील समुद्र किनारी असलेल्या प्राचीन श्रीकृष्ण मंदिरातील श्रीकृष्ण मूर्ती पुनःप्राण प्रतिष्ठापणा आणि कलशारोहन सोहळा १४ एप्रिल पर्यंत चालणार आहे. या सोहळ्याची सुरुवात आज सायंकाळी देऊळवाडा मालवण येथील नारायण मंदिर येथून झाली. ही मिरवणूक एसटी स्टँड, भरड नाका, बाजारपेठ मार्गे, फोवकांडा पिंपळ ते धुरिवाडा श्रीकृष्ण मंदिरपर्यंत काढण्यात आली.

या मिरवणुकीत श्रीकृष्णाची मूर्ती तसेच आकर्षक कलश एका फुलांनी सजविलेल्या गाडीमध्ये ठेवण्यात आला होता. भगवान श्रीकृष्णावर आधारित चित्ररथ तसेच पौराणिक वेशभूषा केलेली चिमुरडी मुले तसेच रंगेबेरंगी फुलांनी सजविलेल्या आकर्षक अशा बैलगाड्या यामुळे मिरवणुक लक्षवेधी ठरली त्यातच श्री जगन्नाथ संगीत विद्यालय कुडाळ आंदुर्ले यांचा ५१ पखवाज अलंकार नादब्रह्म मृदुंग नाद तबला पखवाज ढोलकी कार्यक्रमही मालवण वासीयांची लक्ष वेधून घेणारा ठरला. या मिरवणुकीत कोंबडा, हत्ती, मोर यांच्या नृत्याने रंगत आली. मालवण शहरात प्रमुख धार्मिक अधिष्ठान लाभलेल्या या धुरिवाडा मालवणच्या श्रीकृष्ण मंदिराच्या सोहळ्याला हजारो मालवणवासीयांनी सहभाग दर्शवला.

*धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाची मांदियाळी* या सोहळ्याच्या निमित्ताने उद्या मंगळवार दिनांक १२ एप्रिल २०२२ रोजी धार्मिक विधी सकाळी ८.३० वा. पासून सुरू प्रायश्चित्त संकल्प आणि पंचगव्य प्राशन, देवताना नारळ, विडे व्दारा आमंत्रण, प्राधन संकल्प, गणेशपूजन, पुण्याहवाचन, मातृका पूजन, नांदिश्राध्दं, आचार्यवरण, आचार्यकर्म, मंडपप्रोक्षण, शांतीहोम, जलाधिवास, देवतास्थापन, अग्निस्थापन, अग्निसंस्कार, निद्राकलश स्थापन वास्तू ग्रहयज्ञ, हवन प्रासाद वास्तू स्थापन सायं ६ वाजता कीर्तन, ७:३० वाजता संगीत भजन, रात्री १० वाजता सांस्कृतिक कार्यक्रम धुरिवाडा प्राथमिक शाळा व स्थानिक कलाकारांचा व्हरायटी शो. १३ एप्रिल रोजी सकाळी ८:३० वाजल्यापासून पर्याय हवन, पिंडीका स्नपन, तत्त्व हवन, निद्राकलश विसर्जन तसेच सायंकाळी ६ वाजता कीर्तन, ७:३० वाजता संगीत भजन, रात्री १० वाजता सावंतवाडी आर.डी.एक्स व्हरायटी शो. गुरुवारी १४ एप्रिल रोजी धार्मिक विधी सकाळी ८.३० वा. पासून सुरू पिंडीका तत्त्वन्यास, पिंडिका, प्रार्थना, प्रासाद अलंकार शिखरंकलश ध्वज स्थापना, देवता स्थापना, देवता तत्त्वन्यास देव प्राणप्रतिष्ठा, देवता पूजन, पूजांग हवन, बलिदान, पूर्णाहूति, अभिषेक, होम प्रार्थना सांगता संकल्प दक्षिणादान, महानैवेद्य आणि आरती, दुपारी १ ते ३ या वेळात महाप्रसाद, सायंकाळी ६ वाजता किर्तन, ७:३० वाजता संगीत भजन, रात्री १० वाजता श्री कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ, नेरूर यांचा ट्रिकसीनयुक्त नाट्यविष्कार अजिंक्यतारा. हे कार्यक्रम होणार आहेत

You cannot copy content of this page