सावंतवाडीत कार्यक्रमाचे आयोजन; संयोजन समितीच्या पदाधिकाऱ्यांची माहिती
सावंतवाडी, ता.१०-: येथे मे महिन्यात होणाऱ्या जनवादी साहित्य संस्कृती संमेलनाचे उद्घाटन कवी आणि सिने दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या हस्ते होणार आहे अशी माहिती आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत संयोजन समितीच्या वतीने अध्यक्ष संपत देसाई यांनी दिली दक्षिण कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि गोवा या तीन विभागाच्या पुढाकारातून हे संमेलन आयोजित करण्यात आले आहे
यावेळी समितीचे सचिव अंकुश कदम, राजेंद्र कांबळे, युवराज जाधव, महेश पेडणेकर, दिपक जाधव आदी उपस्थित होते.
श्री देसाई पुढे म्हणाले मे महिन्यात सात व आठ तारखेला होणाऱ्या संमेलनाच्या अध्यक्षा ज्येष्ठ पत्रकार व लेखिका संध्या नरे-पवार असणार आहेत तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १९३२ सालीच्या भेटीने ऐतिहासिक महत्त्व आलेल्या सावंतवाडी भूमीत संपन्न होणाऱ्या जनवादी संमेलनाचे उद्घाटन वंचितांच्या बाजूने कलाक्षेत्रात लक्षवेधी हस्तक्षेप करत असलेले चित्रपट दिग्दर्शक श्री मंजुळे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे यात दक्षिण कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि गोवा या तीन विभागांच्या पढाकारातून हे संमेलन आयोजित करण्यात आले आहे दरम्यान सावंतवाडीत होत असलेल्या संमेलनाचे महाराष्ट्रातून जोरदार स्वागत होत आहे त्यामुळे या संमेलनाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळेल, असा विश्वास श्री देसाई यांनी यावेळी व्यक्त केला
