शॉक लागल्याने कंत्राटी वीज कर्मचारी गंभीर जखमी…

मालवण, दि प्रतिनिधी आचरा वरचीवाडी येथे कमी दाबाचा वीजपुरवठा होत असल्याने त्याची दुरुस्ती करण्यास गेलेले कंत्राटी वीज कर्मचारी आनंद कृष्णा मिराशी हे शॉक लागल्याने गंभीर जखमी झाले आहेत ही घटना आज सकाळी आठ वाजण्याच्या दरम्यान घडली. जखमी मिराशी यांना तत्काळ जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले.

त्यांची प्रकृती अधिकच गंभीर असल्याने त्यांना गोवा बांबोळी येथे हलविण्यात आले आहे. याबाबतची माहिती अशी- आचरा वरचीवाडी येथे कमी दाबाने वीजपुरवठा होत होता. त्यामुळे तो सुरळीत करण्यासाठी आचरा महावितरणचे कंत्राटी कर्मचारी आनंद मिराशी हे सकाळी डीपीमध्ये दुरुस्तीचे काम करत असताना त्यांना जबर शॉक लागला. ते गंभीर जखमी झाल्याने त्यांना तत्काळ ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. त्यांची प्रकृती गंभीर बनल्याने अधिक उपचारासाठी गोवा बांबुळी येथे हलविण्यात आले आहे.

You cannot copy content of this page