विधी सेवा अध्यक्ष बेडगकर यांची माहिती
सावंतवाडी ता 9: उच्च न्यायालय मुंबई, महाराष्ट्र राज्य विधी सेवाप्राधिकरण मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सिंधुदुर्ग ओरोस यांनी दिलेल्या निर्देशास अनुसरुन येथील दिवाणी न्यायालय येथे ७ मे रोजी सकाळी १० वाजता राष्ट्रीय लोकअदालत आयोजित करण्यात आली आहे.
तालुका विधीसेवा समिती सावंतवाडी व तालुका बार असोसिएशन सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने हे राष्ट्रीय लोकअदालत होणार आहे ज्या पक्षकारांचे दिवाणी न्यायालयात प्रलंबित अशी दिवाणी व फौजदारीकडील प्रकरणे किंवा राष्ट्रीयकृत बँका सहकारी बँका, स्वायत्त संस्था, ग्रामपंचायत, नगरपंचायतीकडील वादपूर्व प्रकरणे तडजोडीने मिटवायची आहेत त्यांनी आपली प्रकरणे तालुका विधीसेवा समिती सावंतवाडी या कार्यालयाकडे लवकरात लवकर दाखल करावीत व लोकन्यायालय यशस्वीतेसाठी सहकार्य करावे असे आवाहन दिवाणी न्यायाधीश तथा तालुका विधी सेवा समिती अध्यक्षा श्रीम. आर. आर. बेडगकर यांनी केले आहे.
