हेल्पलाईन आणि अथायु मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलतर्फे कणकवलीत आरोग्य शिबीर

कणकवली ता.०९-:* महिंद्र सावंत मित्र मंडळ, कणकवली ,हेल्पलाईन आणि अथायु मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने, हॉटेल रॉयल इन हॉल, कणकवली येथे आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते

या आरोग्य शिबिराचे उद्घाटन कणकवली हेल्पलाईनचे अध्यक्ष,सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र मनोहर पेडणेकर,कणकवली हेल्पलाईन चे संस्थापक महिंद्र सावंत यांच्या उपस्थितीत सावंतवाडीचे राजेंद्र मसुरकर यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी अथायु मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉ. राहुल चौगुले ( हृदयरोगतज्ज्ञ) यांना राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देवुन सन्मानित केले. राजेंद्र मसुरकर यांना महेंद्र सावंत यांनी सन्मानित केले मूत्रविकार तज्ञ ओंकार दळवी यांना निलेश नारायण मालंडकर यांनी सन्मानित केले अथायु हॉस्पिटल व्यवस्थापन मदन गोरे, अक्षय सुतार, दिनेश डावरे, विजय हराळे,आणि नर्स नेहा, तेजश्री यांना पुष्पगुच्छ देवुन सन्मानित करण्यात आले या प्रसंगी महेश तेली, श्री तळगावकर, सुनिल कोरगांवकर, प्रदीप मांजरेकर, दिलिप मालंडकर आदी उपस्थित होते या शिबिरात बहुसंख्येने पेशंट उपस्थित होते . उपस्थितांनी अशा प्रकारे शिबीर आयोजित करण्यात आले म्हणून आभार व्यक्त केले.

You cannot copy content of this page