राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याचा फोंडाघाट येथे केला निषेध

अनंत पिळणकर यांच्या नेतृत्वाखाली महा विकास आघाडी एकवटली

कणकवली ता.०९-:* राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या घरावर भाजपप्रणीत एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाच्या माध्यमातून केलेल्या हल्ल्याचा फोंडाघाट एसटी स्टँडच्यासमोर राष्ट्रवादी कणकवली तालुक्याच्यावतीने राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांच्या नेतृत्वाखाली निषेध करण्यात आला.

यावेळी तालुकाध्यक्ष राजू पावसकर ,कणकवली युवक जिल्हा उपाध्यक्ष अविनाश चव्हाण, कृषी जिल्हा अध्यक्ष समीर आचरेकर, फोंडाघाट विभागाचे शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य संजय आग्रे, राजू पटेल, संतोष कुरळे, उत्कर्ष मंडळाचे अध्यक्ष प्रकाश सावंत, सेनापती सावंत, रंजन चिके, आनंद मर्ये ,सोसायटी चेअरमन सुभाष सावंत, राष्ट्रवादी कणकवली विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष देवेंद्र पिळणकर, सखाराम हुंबे, प्रकाश मडवी, भिकाजी निकम, संतोष चव्हाण, कृष्णा निकम, रुपेश निकम ,अजित गजभार, उत्तम तेली ,सुरेखा निकम, प्रवीण हिरो निकम, सरिता निकम, निकिता गजभार व कणकवली तालुक्यातील तमाम कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page