कणकवली ता.०९-:* खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, शेठ न.म. विद्यालय व ज्युनिअर कॉलेज खारेपाटणलाला कणकवलीमधील रिगल कॉलेजकडून नुकताच एक संगणक संच भेट देण्यात आला.
काही दिवसांपूर्वी रिगल कॉलेज कणकवलीचे कर्मचारी संदीप राणे व त्यांचे सहकारी खारेपाटण ज्युनियर कॉलेजला सदिच्छा भेट देण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी या प्रशालेची पाहणी केली व विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांना या प्रशालेतील शैक्षणिक वातावरण आवडले व त्यांनी या प्रशालेला एक संगणक संच भेट देण्याचे जाहीर केले होते. त्यांनी तो संगणक संच खारेपाटण ज्युनियर कॉलेजचे सहायक शिक्षक रामचंद्र लोके यांच्याकडे तो सुपूर्द केला. याप्रसंगी रिगल कॉलेजचे प्राचार्य पुरुषोत्तम आरोलकर व बीसीए विभागाच्या प्रमुख श्रीमती तृप्ती मोंडकर हे मान्यवर उपस्थित होते. हा संगणक संच भेट दिल्याबद्दल खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लोकरे , भिकाजी कर्ले, महेश कोळसुलकर, संदेश धुमाळे, आत्माराम कांबळे व संस्थेचे सर्व पदाधिकारी, तसेच प्रशालेचे प्रभारी मुख्याध्यापक संजय सानप व इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी रीगल कॉलेजच्या पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले.
