खारेपाटण शेठ न.म. विद्यालय व ज्युनियर कॉलेजला जयराम राणे यांच्याकडून मदत

कणकवली ता.०९-:* खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, शेठ न.म.विद्यालय व ज्युनियर कॉलेज खारेपाटण मधील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत व्हावी म्हणून खारेपाटण हायस्कुलच्या सन 1964 च्या जुन्या एस.एस.सी बॅच (इयत्ता अकरावी) चे माजी विद्यार्थी जयराम नारायण राणे यांच्याकडून नुकतेच शाळेला 15000 रुपयांची देणगी सुपूर्द करण्यात आली.

खारेपाटण हायस्कुलचे माजी विद्यार्थी तथा वायंगणी नवगुरेवाडी मधील रहिवासी असलेले जयराम राणे हे मुंबईमध्ये पारले सॉफ्ट ड्रिंक कंपनीमध्ये नोकरीला होते. सध्या निवृत्तीचे जीवन आपल्या मूळ गावी वायंगणी येथे व्यथित करत आहेत. आपल्या शाळेची आठवण ठेवून त्यांनी प्रशालेतील होतकरू व गरीब विद्यार्थ्यांना आर्थिक मदत मिळावी म्हणून 15000/- रुपये प्रशालेचे प्रभारी मुख्याध्यापक संजय सानप यांच्याकडे सुपूर्द केले. या त्यांच्या या सामाजिक दातृत्वा बद्दल संस्थेचे अध्यक्ष प्रवीण लोकरे, उपाध्यक्ष भिकाजी कर्ले, सचिव महेश कोळसुलकर, खजिनदार संदेश धुमाळे, सहसचिव आत्‍माराम कांबळे व इतर सर्व पदाधिकारी, प्रशालेचे प्रभारी मुख्याध्यापक संजय सानप व इतर शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी राणे यांचे आभार व्यक्त केले आहेत.

You cannot copy content of this page