रेनबो रायडर्स चे संस्थापक डॉ. बापू परब यांची पत्रकार परिषदेत माहिती
*💫सिंधूदुर्गनगरी दि.१२-:* रेनबो रायडर्स सायकल क्लब, आनंद सावंत, ब्युटिज ऑफ व्हील्स, कुडाळ सायकल क्लब व पेडल्स अँड व्हील्स ऑफ सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने इन्स्पायर सिंधुदुर्ग २०२१ या सायकल मॅरेथॉन स्पर्धचे आयोजन ३१ जानेवारी रोजी करण्यात आले आहे. पहाटे ५ वाजता ओरोस येथील भवानी मंदिर सदानंद रेसिडेन्सी येथून होणार आहे. स्वच्छ सिंधुदुर्ग आणि हरित सिंधुदुर्ग, सायकल राईड सर्वांसाठी, सर्वांच्या आरोग्यासाठी ही टॅगलाइन घेऊन ही स्पर्धा संपन्न होणार आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्यांना टी शर्ट, मेडल आणि प्रमाणपत्र दिले जाणार आहेत. तसेच या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकाला हेल्मेट सक्तीचे करण्यात आले आहे. तरी या स्पर्धेत जास्तीतजास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे असे, आवाहन रेनबो रायडर्सचे संस्थापक डॉ. बापू परब यांनी पत्रकार परिषदेत केले. सावंतवाडी पहिली सायकल मॅरेथॉन स्पर्धा झाली होती. त्यांनतर कुडाळ मध्ये आणि आता या स्पर्धेचे यजमानपद रेनबो रायडर्स सायकल क्लब ला मिळाले आहे. या बाबत माहिती देण्यासाठी या पत्रकार परिषदेचे आयोजन कुडाळ सायकल क्लबच्यावतीने करण्यात आले होते. यावेळी रेनबो रायडर्स क्लबचे डॉ. सिद्धार्थ परब, गजानन कांदळगावकर, रूपेश तेली, सिद्धेश सावंत, विक्रांत पालव हे उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉ. बापू परब म्हणले की, रेनबो रायडर्स क्लब स्थापन होवून तींनवर्षे झाली. या तीन वर्षात सायकल क्लबने कुडाळ तालुक्याला सायकल नकाशावर एक टीमटीमता तारा बनवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. इन्स्पायर सिंधुदुर्ग २०२१ चे आयोजन हे मुळात आपल्या जिल्हय़ाला सायकलिंगसाठी इन्स्पायर करणे प्रोत्साहित करणे हेच आहे. या स्पर्धेचे हे तिसरे वर्ष असून पहिल्या वेळी सावंवाडी नंतर कुडाळ येथे इन्स्पायर सिंधुदुर्ग सायकल मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता जिल्ह्यातील सायकलिंगला सुगीचे दिवस येतील अशी आशा निर्माण झाली आणि यावेळी रेनबो रायडर्स सायकल क्लबकडे यजमानपद मिळाल्याने हा दुध शर्करा योगच आहे. ही स्पर्धा २५, ५० व १०० किलोमीटर अशी विभागलेली असेल त्यात यजमान सिंधुदुर्गासह गोवा कर्नाटक औरंगाबाद पुणे कोल्हापूर मुंबई व जिल्ह्यातील सुमारे ४०० सायकलपटू सहभागी होणार आहेत. ही स्पर्धा पूर्ण करणाऱ्या सर्वांनाच मेडल्स सर्टिफिकेट्स दिली जाणार आहेत तर सहभागी होणार्या सर्व स्पर्धकांना टीशर्ट दिली जातील.या स्पर्धेत २५ किलोमीटर गटात स्पर्धकांना ओरोस ओसरगाव ओरोस असा मार्ग तर ५० किलोमीटर गटात ओरोस कणकवली सांगवे कणकवली ओरोस तर १०० किलोमीटर गटात ओरोस कणकवली सांगवे कानेडी फोंडा कणकवली ओरोस असा मार्ग ठेवण्यात आला आहे. या मार्गावरून सायकल सफरीने सिंधुदुर्गातील निसर्ग नव्याने गवसेल हे मात्र नक्की. स्पर्धेसाठी २५ किलोमीटर २ तास ५०किलोमीटर ४ तास व १०० किलोमीटर ७ तास असा वेळ निश्चित केला आहे. स्पर्धेच्या मार्गावर क्लबतर्फे सपोर्ट व्हेईकल, ऍम्ब्युलन्स सोबत तज्ज्ञ सायकलस्वार आशा सुरक्षेच्या दृष्टीने जय्यत तयारी ठेवली जाईल. स्पर्धेमध्ये जिल्हा बाहेरून येणारे स्पर्धक असतीलच पण सोबत आपल्या जिल्ह्यातील जास्तीत जास्त सायकल स्वारांनी सहभागी होऊन आपला फिटनेस सिद्ध करावा व पुन्हा एकदा सायकलिंगला प्रोत्साहित करावे असे आवाहन क्लबतर्फे करण्यात आले आहे. ही स्पर्धा यादगार होण्याच्या दृष्टीने क्लबने जय्यत तयारी केली आहे खरंतर ही स्पर्धा म्हणजे स्वच्छ पर्यावरणाचा व उत्तम आरोग्याचा संदेश देणारी रॅली म्हटली तरी वावगे ठरणार नाही या स्पर्धेत क्रमांकांना फारसे महत्त्व नसून स्पर्धा पूर्ण करण्यावर जास्त भर देण्यात येणार आहे. असेही डॉ बापू परब यांनी सांगितले.
