देवगड ता.०८-:* तालुक्यातील शिरगाव रामनगर येथील श्रीराम मंदिरात १० एप्रिल रोजी श्री रामनवमी उत्सव पारंपरिक रीतिरिवाजाप्रमाणे साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सर्व कार्यक्रमास ग्रामस्थांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन श्री पावणादेवी बांदेश्वर मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
विविध धार्मिक कार्यक्रम सकाळी ९ वाजता कीर्तन,दु १२ वा .श्री राम जन्मोत्सव सोहळा,महाआरती महाप्रसाद ३ वा. श्री सत्यनारायण महापुजा सायंकाळी ७ वा.स्थानिक सुस्वर भजने, रात्री ९.३० वा. श्री महादेश्वर प्रसादिक भजन मंडळ नाडण बुवा संदीप पुजारे आणि श्री भूतेश्वर प्रासादिक भजन मंडळ खुडी बुवा संतोष जोईल यांचा डबलबारी भजनाचा सामना होणार आहे.
