केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडीत विविध कार्यक्रम

संजू परब यांची माहिती

सावंतवाडी ता.०८-: माजी मुख्यमंत्री तथा केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी शहर भाजप कडून क्रीडा स्पर्धासह सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार असून, अनाथ आश्रमाला धान्य वाटप करण्यात येणार आहे. तसेच सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप करण्यात येणार आहे.अशी माहिती माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी दिली आहे.

यावेळी सर्व भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी १० एप्रिल रोजी सकाळी ११.०० वाजता उपस्थित राहावे असे आवाहन संजू परब यांनी केले आहे.

You cannot copy content of this page