वेंगुर्ला ता.०७-:* बॅ.बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाचे वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ, जिमखाना डे व मुंबई विद्यापिठ पदवी प्रदान वितरण समारंभ आंतरराष्ट्रीय शुटींग व्हॉलीबॉल पंच अशोक दाभोलकर व जिल्हा पॉवर लिफ्टींग असोसिएशनचे सचिव दिलीप नार्वेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.
या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणा-या अपूर्वा परब, श्रीराम गावडे, मारिया आल्मेडा, हर्षा बोवलेकर, आकाश राणे, सानिका करंगुटकर, ओम पवार, चैताली पवार, अंकिता कांबळी आदी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांनी खेळ आणि शिक्षण यांचा समन्वय साधून आपले भवितव्य उज्वल करावे असे मत दाभोलकर यांनी तर हल्लीचे जग स्पर्धात्मक असल्यामुळे विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम घेऊन यश संपादन करावे असे आवाहन नार्वेकर यांनी केले. विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच विविध गुणांना महाविद्यालयीन जीवनातच वळण लावावे असे प्राचार्य डॉ.व्ही.ए.देऊलकर यांनी सांगितले.
यावेळी पर्यवेक्षक डी.जे.शितोळे, सुरेंद्र चव्हाण, डॉ.ए.पी.बांदेकर, प्रा.विरेंद्र देसाई, प्रा.हेमंत गावडे, प्रा.के.आर.कांबळे, प्रा.डी.आर.आरोलकर यांच्यासह शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. हा कार्यक्रम शिक्षण प्रसारक मंडळाचे सेक्रेटरी जयकुमार देसाई, कौन्सिल मेंबर दौलतराव देसाई व प्रशासन अधिकारी मंजिरी मोरे-देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली क्रिडा संचालक जे.वाय.नाईक यांनी घेतला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा.व्ही.व्ही.सावंत, प्रा.व्ही.पी.नंदगिरीकर, प्रा.एम.आर.नवत्रे, प्रा.एन.बी.नैताम यांनी परिश्रम घेतले. क्रिडा संचालक जे.वाय. नाईक यांनी वार्षिक अहवाल वाचन, डॉ.डी.एस.पाटील यांनी सूत्रसंचालन केले.
