वेंगुर्ला ता.०७-:* मातोंड विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लि. मातोंडच्या चेअरमनपदी मकरंद प्रभू (मातोंड) तर व्हाईस चेअरमनपदी विजय मोरजकर (पेंडूर) यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
मातोंड सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणूकित गाव पॅनलने आपले एकहाती वर्चस्व प्रस्थापित केल्यानंतर सोसायटीच्या चेअरमन व व्हाईस चेअरमनची निवडप्रक्रिया सहकार खात्याचे अधिकारी एस.एल.कावले यांच्या उपस्थितीत ५ एप्रिल रोजी सोसायटीच्या श्री देव रवळनाथ सभागृहात संपन्न झाली.
यावेळी चेअरमन पदासाठी गाव पॅनलचे मकरंद प्रभू तर व्हाईस चेअरमन पदासाठी गाव पॅनलचे विजय मोरजकर यांचे एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी सचिव अण्णा मातोंडकर, सोसायटी संचालक विद्याधर तावडे, ज्ञानेश्वर केळजी, एम.जी.मातोंडकर, शेखर परब, पप्पू परब, रविंद्र नाईक, रामदास रेडकर, दिपाली परब, सुहासिनी वैद्य, वसंत खाजणेकर, गणेश गोसावी आदी उपस्थित होते.
यावेळी जेष्ठ गावकर तथा गाव पॅनेल प्रमुख रमाकांत परब व उदय परब यांनी नवनिर्वाचित चेअरमन प्रभू व व्हाईस चेअरमन मोरजकर यांचे पुष्पहार घालून अभिनंदन केले. यावेळी मातोंड सरपंच जानवी परब, पेंडूर सरपंच गीतांजली कांबळी, पंचायत समिती सदस्य श्यामसुंदर पेडणेकर, बाळू परब, तंटामुक्ती अध्यक्ष तुकाराम परब, सामाजिक कार्यकर्ते देवा कांबळी, वास्कोचे उपनगराध्यक्ष शशिकांत परब, जगन्नाथ गावडे, उत्तम वैद्य, सुभाष सावंत, राहुल प्रभू, काका सावंत, संतोष परब, गोविंद सावंत, बाळा मोहिते, जगदीश परब, निलेश वैद्य, सीताराम जाधव, पत्रकार दीपेश परब यांच्यासाहित ग्रामस्थ उपस्थित होते.
