शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या विद्या शिरस यांची सिंधुदुर्गच्या क्रीडा अधिकारीपदी नियुक्ती

कणकवली ता.०६-:* जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग येथे नवनियुक्त जिल्हा क्रीडा अधिकारी म्हणून शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या व आंतरराष्ट्रीय खेळाडू असलेल्या श्रीम. विद्या शिरस यांनी कार्यभार स्वीकारला आहे. विद्या शिरस या आंतरराष्ट्रीय पॉवरलिफ्टर खेळाडू असून त्या एशियन स्पर्धेतील रौप्यपदक पदक विजेत्या आहेत.

तसेच त्यांना क्रीडा क्षेत्रातील मानाचा शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त झाला आहे. यापूर्वी त्या पुणे बालेवाडी येथील मुख्यालयात कार्यरत होत्या. पदोन्नतीद्वारे सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा अधिकारी म्हणून त्यांना बढती मिळाली आहे. यापूर्वी सलग दोन वर्ष सिंधुदुर्गात प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी म्हणून कार्यभार सांभाळणारे विजय शिंदे हेही आंतरराष्ट्रीय पॉवरलिफ्टर खेळाडू आहेत. गुणवंत आंतरराष्ट्रीय खेळाडू सिंधुदुर्ग जिल्ह्याला जिल्हा क्रीडा अधिकारी म्हणून लाभल्याने क्रीडा विश्वासातून समाधान व्यक्त होत आहे.

You cannot copy content of this page