मसुरे जैन भरतेश्वर मंदिरात रामनवमी उत्सव

मालवण ता.०६-:* कसबा मसुरेचे ग्रामदैवत देव जैन भरतेश्वर मंदिरात रामनवमी उत्सवानिमित विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गुढीपाडव्यापासून कार्यक्रमांना प्रारंभ झाला आहे.

६ ते १० एप्रिल या कालावधीत रोज रात्री ८.१५ वाजता पुराण (सुरेश जोशी), ८.३० वाजता पालखी सोहळा होणार आहे. ६ रोजी रात्री ९ वाजता किरण पारकर यांचे कीर्तन, ७ रोजी रात्री ९ वाजता वीणा परब यांचे कीर्तन, ८ रोजी रात्री ९ वाजता अक्षय परुळेकर यांचे कीर्तन, ९ रोजी रात्री ९ वाजता मनोज कोचरे यांचे कीर्तन, १० रोजी राम नवमी निमित्त सकाळी ९ वाजता पुराण (सुरेश जोशी), सकाळी ९.३० वाजता संदेश गोसावी यांचे कीर्तन, दुपारी १२ वाजता रामजन्म उत्सव, १२.३० वाजता महाआरती, १२.४५ पालखी सोहळा, १.१५ महाप्रसाद, रात्री ९ वाजता संदेश गोसावी यांचे कीर्तन होणार आहे. भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन देवस्थानप्रमुख बाबूराव प्रभूगावकर, संग्राम प्रभूगावकर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page