मालवणात डॉ. आंबेडकर, महात्मा फुले जयंती कार्यक्रम

मालवण ता.०६-:* फुले, शाहू विचारमंचातर्फे १४ रोजी मालवण येथील मामा वरेरकर नाट्यगृह येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले जयंती महोत्सव साजरा केला जाणार आहे. या संयुक्त जयंतीनिमित्त मालवणात १४ व १५ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. १४ रोजी सकाळी ८ ते ९ वाजता रॅली, सकाळी ११ वाजता मामा वरेरकर नाट्यगृह येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

या सभेस प्रमुख वक्ते म्हणून ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. राजन गवस, अध्यक्षस्थानी किशोर चव्हाण, गटविकास अधिकारी जे. पी. जाधव, दोडामार्ग गटविकास अधिकारी मिलिंद जाधव, नायब तहसीलदार आनंद मालवणकर उपस्थिती राहणार आहेत. दुपारी २.३० वाजता स्वरनिनाद, कट्टा निर्मित ‘ऑर्केस्ट्रा क्रांतिसूर्य’ हा भीमगीतांचा कार्यक्रम, १५ रोजी रात्री ९.३० वाजता एसटी स्टँड समाज मंदिर येथे सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. उपस्थित राहवे, असे आवाहन अध्यक्ष किशोर चव्हाण, संतोष मालवणकर यांनी केले.

You cannot copy content of this page