वायरी येथील केळबाई देवी जत्रोत्सवानिमित्त कार्यक्रम

मालवण ता.०६-:* मालवण वायरी येथील कुलस्वामिनी केळबाई देवीच्या जत्रोत्सवानिमित्त दि. ७ ते ९ एप्रिल रोजी विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

७ रोजी रात्री ९.३० वा. रवळनाथ भजन: मंडळ, राठिवडेचे बुवा दीपक मेस्त्री यांचे डबलबारी भजन, ८ रोजी चैत्र शुद्ध सप्तमी रोजी सकाळी ८ वाजता श्रींची समुद्र स्नानासाठी पालखी मिरवणूक, दुपारी १ वाजता महाप्रसाद, सायंकाळी ४ वाजता सत्यनारायण महापूजा, ७ वाजता केळबाई देवी भजन मंडळाचा कार्यक्रम, रात्री ९.३० वाजता ओंकार ग्रुप, मालवण यांचा व्हरायटी शो, ९ रोजी सकाळी १० वाजता होमहवन, दुपारी १.३० वाजता महाप्रसाद, सायंकाळी ४.३० वाजता प्रभूदास आजगावकर यांचे कीर्तन, सायंकाळी ६ वाजता जय हनुमान भजन मंडळ, कोतवडे – रत्नागिरीचे बुवा विजय मयेकर यांचे भजन, रात्री १० वाजता श्रींची मंदिराभोवती पालखी प्रदक्षिणा, ११ वाजता दत्त माऊली दशावतार नाटक कार्यक्रम होणार आहेत. भाविकांनी कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन समस्त मयेकर बंधू मंडळाने केले आहे.

You cannot copy content of this page