मालवण ता.०६-:* महसूल विभाग, वन विभाग व मालवण तहसील कार्यालय यांच्यातर्फे संजय गांधी निराधार अनुदान योजनेमार्फत ८ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता मामा ‘वरेरकर नाट्यगृहात संजय गांधी निराधार अनुदान योजना महाशिबीर आयोजित करण्यात आले आहे.
यावेळी विविध प्रकारचे अर्ज स्वीकारले जाणार आहेत. संजय गांधी योजना व श्रावणबाळ योजना लाभार्थ्यांचे हयात दाखले- आवश्यक कागदपत्रे : बँक पासबूक झेरॉक्स प्रत, आधारकार्ड झेरॉक्स प्रत, पासपोर्ट साईज फोटो. उत्पन्न दाखले अर्ज- कागदपत्रे : शिधापत्रिका व आधारकार्डची झेरॉक्स प्रत, रहिवासी दाखला, घरपत्रक उतारा, बँक पासबूक झेरॉक्स, सात बांरा व आठ अ, तीन पासपोर्ट साईज फोटो आदी कागदपत्रे आवश्यक आहेत. संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनांचेही अर्ज स्वीकारले जातील. शिबिराचा गरजूंनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
