सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेज परवानगीसाठी केले सहकार्य;खा विनायक राऊत, खा अरविंद सावंत यांनी मानले आभार
ओरोस ता.०६-:* सिंधुदुर्ग वैद्यकीय महाविद्यालयाच्या परवानगी प्रस्तावाची वस्तूस्थिती खासदार विनायक राऊत यांनी निदर्शनास आणून देऊन परवानगी देण्यासाठी विनंती केल्यानंतर तत्परतेने ज्या संदर्भात योग्य दखल घेऊन सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला परवानगी दिली, त्याबद्दल काल मंगळवारी खा. राऊत व खा. अरविंद सावंत यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांची भेट घेऊन त्यांचे आभार व्यक्त केले. भविष्यात महाविद्यालयासंदर्भात आवश्यक सहकार्य मिळण्यासाठी विनंती केली.
श्री. मांडवीय यांनी सुद्धा अतिशय कमी वेळामध्ये महाविद्यालयाच्या परवानगीसाठी आवश्यक असलेल्या बाबींची पूर्तता केल्याबद्दल खासदार राऊत यांचे कौतुक करून भविष्यातील संपूर्ण सहकार्याची ग्वाही दिली.
