सीईटी परीक्षेबाबत 9 रोजी ऑनलाईन मार्गदर्शन शिबिर

*सावंतवाडी ता.०४-:* येथील बी.एस.बांदेकर कॉलेज ऑफ फाईन आर्ट ( अप्लाईड आर्ट) कला महाविद्यालयातर्फे बी. एफ. ए पदवी परीक्षा अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षा संदर्भातील सी. ई. टी. परीक्षेबाबतचे ऑनलाईन मार्गदर्शन शिबिर ९ एप्रिल रोजी सायंकाळी ४:३० ते ५:३० या वेळेत आयोजित करण्यात आले असून, या क्षेत्रात करिअर करू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य दिलीप धोपेश्र्वरकर यांनी केले आहे.

या शिबिरात सहभागी होण्यासाठी संतोष मोरजकर ९४०५८३०२८८ आणि सिद्धेश नेरूरकर ९४२०२६०१०३ या क्रमांकावर संपर्क करण्याचे आव्हान करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page