युवक गंभीर जख्मी
वेंगुर्ले ता.०४-:* वेंगुर्ले मठ मार्गे रस्त्यावर भटवाडी येथे रस्त्याच्या कडेला टुव्हीलर लावून त्यावर बसलेल्या प्रसाद माने यांच्या टुव्हीलरला पाठीमागून येणाऱ्या लाल रंगाच्या चारचाकी गाडीने ठोकरले. या अपघातात प्रसाद माने हा गंभीर जख्मी झाला. या प्रकरणी वेंगुर्ले पोलीसांत अपघात दाखल झाला आहे.
वेंगुर्ले शहरांत मठ मार्गे जाणाऱया रस्त्यावर मुख्य भटवाडी येथे डीओ टुव्हीलर जी.ओ.-07-एम.5182 हि गाडी उभी करून त्यावर प्रसाद नामदेव माने (29) हा बसलेला होता. वेंगुर्लेतून मठ मार्गे कुडाळ-सावंतवाडीकडे भरधांव वेगाने जाणाऱ्या चारचाकी लाल रंगाच्या गाडीने रविवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारांस त्या डीओ गाडीला पाठीमागून जोरदार धडक दिली. व तो अपघात लक्षात येताच गाडी न थांबविताच ते आपली चारचाकी गाडी घेऊन पळून गेले. या अपघातात टुव्हीलरवर बसलेला प्रसाद नामदेव माने (29) हा युवक डोक्याला, तोंडाला, पाठीला व नाकाला दुखापती झाल्याने गंभीर जख्मी झाला.
त्या युवकांस तेथे असलेल्या स्थानिक ग्रामस्थांनी तात्काळ उपजिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्याला वेंगुर्ले उपजिल्हालयातील प्राथमिक उपचारांअंती गोवा बांबुळी येथील रूग्णालयात अधिक उपचारासाठी हलविण्यांत आले आहे. या अपघात प्रकरणी जख्मी प्रसाद माने याचा भाऊ प्रवीण नामदेव माने (29) याने वेंगुर्लेत पोलीसांत खबर दिली. त्यानुसार वेंगुर्ले पोलीसांत अपघताची नोंद झाली आहे. या अपघाताचा अधिक तपास पोलीस निरीक्षक तानाजी मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी विठ्ठल धुरी हे करीत आहेत.
