मालवणच्या नीलम मयेकर ठरल्या मानाच्या पैठणीच्या विजेत्या

रामेश्वर मांड मित्रमंडळातर्फे आयोजन

मालवण ता.०४-:* मालवण सोमवार पेठ येथील श्री रामेश्वर मांड मित्रमंडळातर्फे गुढीपाडवा उत्सवाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या खेळ पैठणीचा स्पर्धेत मालवण चिवला बीच येथील सौ. नीलम प्रसन्नकुमार मयेकर या मानाच्या पैठणीच्या विजेत्या ठरल्या.

मालवण येथील भंडारी ए. सो.हायस्कुलच्या पटांगणावर आयोजित या स्पर्धेचे उद्घाटन भंडारी हायस्कुलचे मुख्याध्यापक वामन खोत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी माजी नगरसेविका सौ. ममता वराडकर उपस्थित होत्या. या स्पर्धेत एकूण ४९ महिलांनी सहभाग घेतला.

या स्पर्धेत द्वितीय विजेत्या सौ. भारती भरत घारकर यांना सोन्याची नथ, तृतीय विजेत्या सौ. आर्या अभय गावकर यांना प्रेशर कुकर तसेच इतर सर्व सहभागी महिलांना आकर्षक भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. यावेळी सदानंद चुरी, छोटू तारी, संतोष खराडे, दिलीप वायंगणकर, प्रसाद आरोंदेकर, केदार सावंत, शिवाजी म्हापणकर, वसंत धुरी, सुरेश पेडणेकर, योगेश कांबळे, उद्देश चव्हाण, मेघा सावंत, बाळा आचरेकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page