वाघाच्या हल्ल्यात मृत झालेल्या म्हैशीचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या…

भाजप प्रभारी तालुकाध्यक्ष गजानन पालयेकर यांची वनविभागाकडे मागणी

आंबोली, ता.०४:-* चौकुळ सातीवन येथील पडवाचो पाचा येथे ४ दिवसापूर्वी येथील सुभाष नाईक यांची म्हैस वाघाने खाल्ली याचा पंचनामा करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी आंबोली मंडळ भाजप प्रभारी तालुकाध्यक्ष गजानन पालेकर यांनी वनविभागाकडे केली आहे.

चौकुळ आंबोली येथे गेले २महिने वाघाचे दर्शन मध्ये मध्ये होत असते.गेल्या काही दिवसात अनेक जनावरे वाघाने मारून फस्त केली आहेत.चौकुळ येथील सुभाष नाईक यांची म्हैस बेपत्ता होती गेले ४ दिवस शोधाशोध सुरू होती.आज सातीवन येथे पडवाचा पाचा येथे म्हैस खाल्लेली हाडे आढळून आली.त्यामुळे या ठिकाणी पंचनामा करून श्री नाईक यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी आंबोली वनक्षेत्रपाल सौ.विद्या कोडगी यांच्याकडे भाजप प्रभारी तालुकाध्यक्ष गजानन पालेकर,आंबोली माजी सरपंच शशिकांत गावडे,प्रकाश गावडे,चेअरमन पांडुरंग गावडे यांनी केली.यावेळी वनपाल श्री.वसंत चाळके उपस्थित होते.यावेळी वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी निवेदनातून केली आहे.

You cannot copy content of this page