वेंगुर्ले मध्ये ” किल्ले पाहिलेला माणूस ” माहितीपटाचे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर करण्यात आले प्रदर्शन…

वेंगुर्ले ता.०४-:गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर शनिवार दिनांक २ एप्रिल रोजी अखिल गिर्यारोहण महाराष्ट्र महासंघ निर्मित “गोपाळ नीलकंठ दाण्डेकर – किल्ले पाहिलेला माणूस” या माहितीपटाचे प्रदर्शन वेंगुर्ले येथील संजीवनी हाँस्पिटल सभागृहात संतसाहित्य लेखक अँड. देवदत्त परूळेकर व आंतरराष्ट्रीय किर्तीचे क्रिडापटु अशोक दाभोलकर यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन सिंधुदुर्ग जिल्हा गिर्यारोहण संघटना व वेंगुर्ले मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.

यावेळी सिंधुदुर्ग गिर्यारोहण संघटनेचे अध्यक्ष प्रकाश नारकर, कार्याध्यक्ष एस्.एन. पाटील, कमलेश चव्हाण, बालरोगतज्ज्ञ डॉ. प्रल्हाद मणचेकर, वेंगुर्ले मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. राजेश्वर उबाळे, वेंगुर्ले मेडिकल असोसिएशनचे सचिव व सिंधुदुर्ग जिल्हा गिर्यारोहण संघटनेचे संचालक डॉ. संजीव लिंगवत, डॉ. निलेश कोदे, सौ.मंगलताई परुळेकर, डॉ.रिना उबाळे, डॉ.सई लिंगवत, यतीन पालव, दिनेश टेमकर, अजय शर्मा, परेश नांदोसकर, सौ.दाभोलकर, जगदीश येजरे आदी मान्यवर उपस्थित होते. ज्यांनी दुर्ग ही तीर्थक्षेत्रे मानली व संपूर्ण आयुष्य दुर्गभ्रमंती मधे झोकून दिले, असे दुर्ग महर्षी – गोपाल नीलकण्ठ दाण्डेकर यांच्या आयुष्यावर आणि विचारांवर हा माहितीपट बनवण्यात आला आहे. किल्ले हे स्फूर्ति स्थाने आहेत, त्यांचे जतन संवर्धन हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, हा या माहितीपटामागील दृष्टिकोन आहे. ज्यांनी दुर्ग ही तीर्थक्षेत्रे मानली व संपूर्ण आयुष्य दुर्गभ्रमंती मधे झोकून दिले, असे दुर्गमहर्षी – गोपाल नीलकण्ठ दाण्डेकर यांच्या आयुष्यावर आणि विचारांवर आधारित ‘किल्ले पाहिलेला माणूस’ हा माहितीपट प्रदर्शित झाला. या माहितीपटाचे लेखन आणि दिग्दर्शन श्री. मिलिंद भणगे यांनी केले असून सुप्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी व सुप्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे यांनी निवेदन केले आहे. तसेच श्री. अमोल साळुंके यांनी चित्रिकरण केले आहे. या महितीपटाची निर्मिती अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाने केली आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकाश नारकर यांनीस्वागत डॉ. राजेश्वर उबाळे यांनी तर सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. संजीव लिंगवत यांनी केले.

You cannot copy content of this page