सेंट्रल गव्हर्मेंट पेन्शनर्स व फॅमिली पेन्शनर्स यांचे १२ एप्रिल रोजी कणकवलीत अधिवेशन…

मालवण (प्रतिनिधी) ऑल इंडिया सेंट्रल गव्हर्नमेंट पेन्शनर्स असोसिएशन, शाखा सिंधुदुर्ग विभाग मालवण यांच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सेंट्रल गव्हर्नमेंट पेन्शनर्स व फॅमिली पेन्शनर्स यांचे जिल्हा अधिवेशन दि. १२ एप्रिल रोजी सकाळी १०.३० वाजता मातोश्री मंगल कार्यालय कणकवली येथे जिल्हाध्यक्ष एस. ए. डीसोजा याच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले आहे.

या अधिवेशनास उद्घाटक म्हणून बीएसएनएल चे सेवानिवृत्त डेप्युटी जनरल मॅनेजर एच. एफ. चौधरी, प्रमुख पाहुणे पुणे मुख्यालयचे ऑर्गनायझिंग सेक्रेटरी एस. बी. सोनाळकर, असिस्टंट जनरल सेक्रेटरी मनोहर पत्की, रत्नागिरी ब्रांच सेक्रेटरी नरेंद्र बांदिवडेकर आदी मान्यवर उपस्थित राहून संघटना बांधणी बाबत मार्गदर्शन करणार आहेत. पेन्शन बाबत नवीन आदेशांची माहिती देण्यात असून नवीन कार्यकारिणी निवडही होणार आहे. तरी सर्व सेंट्रल गव्हर्नमेंट पेशनर्स यांनी अधिवेशनास उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष एस. ए. डीसोजा, सचिव ए. डी. जोशी, खजिनदार के. व्ही. चव्हाण यांनी केले आहे.

You cannot copy content of this page