मालवण ता.०४-:* मालवण येथील अष्टपैलू कलानिकेतनतर्फे राम गणेश गडकरी स्मृती जिल्हास्तरीय सवेश साभिनय नाट्यगीत गायन स्पर्धा २३ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वा. दत्त मंदिर, भरड येथे आयोजित केली आहे. तसेच २४ रोजी त्याच रंगमंचावर संगीत ‘कान्होपात्रा,’ मालवणी ‘वत्सलाहरण, ‘ ‘अश्रूंची झाली फुले,’ संगीत, ‘गीता गाती ज्ञानेश्वर’ अशा चार नाटकांतील नाट्यप्रवेश सादर केले जाणार आहेत. लाभ घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष भालचंद्र केळुसकर बुवा यांनी केले आहे.
ही स्पर्धा १० ते १४, १५ ते २०, २१ वर्षांवरील खुला गट अशा तीन गटांत होणार आहे. अधिक माहिती साठी कौशिकी काजरेकर (९०८२५३६८४४) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
